ब्रिटनच्या लष्करातील सर्व पदे महिलांसाठी खुली 

लंडन: ब्रिटनच्या लष्करातील सर्व पदे महिलांसाठी खुली करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. ब्रिटनच्या लष्करात आत्तापर्यंत महिलांना काही मर्यादित क्षेत्रातच प्रवेश होता. इन्फन्ट्री सारख्या क्षेत्रात महिलांना प्रवेश नव्हता. पण आता मात्र ब्रिटन लष्कराने सर्व जागा महिलांसाठीही खुल्या केल्या आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री गॅव्हीन विल्यमसन यांनी दिली.

ते म्हणाले की, हा देशातील महिलांसाठी अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे. येत्या डिसेंबर पासून लष्कराच्या सर्व रिक्त पदांवर महिलांनाहीं अर्ज करण्यास अनुमती राहणार आहे. त्यांचे प्रशिक्षण एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. ब्रिटीश लष्करातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या रॉयल मरिन्स मध्येही त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2016 मध्ये ब्रिटीश लष्करातील कॉम्बॅट युनिट मध्ये महिलांना प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली होती. आता यापुढे ब्रिटीश लष्कर लैंगिक आधारावर भेदभाव करणार नाहीं आता यापुढे लष्कराच प्रवेश देताना केवळ क्षमता बघितली जाईल, लैंगिक आधारावर लष्करी भरती होणार नाहीं असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)