ब्रिटनच्या महाराणीनंतर राष्ट्रकुलचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडे ?

नवी दिल्ली – राष्ट्रकुलचे नेतृत्व आजवर ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ करत आली आहे. परंतु आता महाराणीने आयुष्याची नव्वदी पार केली आहे. 92 वर्षांच्या महाराणीला प्रवास करणे आणि सतत सक्रिय राहणे शक्‍य नाही. त्यामुळे महाराणी राष्ट्रकुलचे नेतृत्व सोडण्यास उत्सुक आहे. मात्र राष्ट्रकुलचे नेतृत्व हे आनुवांशिक नसल्याने महाराणीनंतर राष्ट्रकुलचे नेतृत्व कोणाकडे, हा एक यक्षप्रश्‍न आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राष्ट्रकुलचे नेतृत्व येण्याची शक्‍यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रकुल राष्ट्रप्रमुखांची बैठक (चोगम) सोमवारपासून लंडनमध्ये सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी लंडनला पोहचणार आहेत. या बैठकीत इतर सर्व मुद्यांबरोबर महाराणीनंतर राष्ट्रकुलचा नेता कोण? हा एक महत्त्त्वाचा विषय असणार आहे. राष्ट्रकुलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी भारताने आपली सक्रियता वाढवली आहे. जागतिक नेतृत्व करण्याच्या दिशेने राष्ट्रकुलचे नेतृत्व हे भारतासाठी पहिले पाऊल आहे. परदेशातील अनेक माध्यमांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रकुलसाठी भारताने आपले आर्थिक योगदान दुप्पट केले असल्याची खबर आहे.

चोगमसाठी 2009 नंतर भारताच्या पंतप्रधानांनी हजेरी लावलेली नाही. जगातील विविध संस्थांमध्ये भारताची सक्रियता वाढत असून राष्ट्रकुलही त्याला अपवाद नाही, असे आंतरराष्ट्रीय मंचावर भारताला नेतृत्त्व करायचे आहे. आणि ब्रिटनचीही तशीच इच्छा आहे, असे ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)