ब्रिज या खेळाचा जुगाराशी कोणताही संबंध नाही – प्रणव वर्धन

जकार्ता: ब्रिज या खेळाचा जुगाराशी कोणताही संबंध नाही. या खेळात नशीब नव्हे तर तुमचे कौशल्यच तुम्हाला जिंकून देऊ शकते, असे ठाम मत आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रिज या पत्त्यांच्या खेळात सुवर्णपदक जिंकणाऱ्या विजेत्यांनी व्यक्त केले.
प्रणव वर्धन आणि शिवनाथ सरकार यांनी ही सोनेरी कामगिरी केली. वर्धन म्हणाले की, हा खेळ तर्कावर आधारित आहे. एवढेच नव्हे तर बुद्धिबळाप्रमाणे तो मनोबलाचाही खेळ आहे. बुद्धिबळात तुम्ही एकमेकांशी खेळता पण इथे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यासह खेळता मात्र त्याच्याशी एकही शब्द न बोलता. तुम्हाला एकमेकांच्या चाली, डावपेच समजणे आवश्‍यक असते. माझ्या मनात काय आहे, हे जाणण्याची कला या खेळात आहे.

पत्त्यांचा खेळ म्हटल्यावर लोकांना याबद्दल शंका येते. पण वर्धन म्हणतात की, हा जुगाराचा प्रकार नाही. सर्वच खेळाडूंना सारख्या संख्येने पत्ते मिळतात त्यामुळे इथे नशिबाचा भाग नसतो. तुम्ही आलेल्या परिस्थितीला कसे सामोरे जाता हे महत्त्वाचे असते. जे पत्ते तुमच्याकडे असतात, तसेच ते पुन्हा येत नाहीत. तुम्हाला जे पत्ते मिळाले असतील त्याचा आदर करावा लागतो. तुमच्या हातात असलेल्या पत्त्यांबद्दल तुम्हाला प्रेम असेल तर तुम्ही पुढील डावपेच रचू शकता.
सरकार म्हणाले की, हा खेळ केवळ वृद्ध माणसेच खेळू शकतात हा समजही खोटा आहे. सिंगापूरच्या संघात तरुण खेळाडू होते. अनेक खेळाडू हे विशीतले होते. बंगालमध्ये सर्व वयोगटातील लोक हा खेळ खेळतात.

जुआ खेलने जा रहे हो

वर्धन यांनी एका घटनेचा उल्लेख यावेळी केला. ते म्हणाले की, मी मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे एका स्पर्धेसाठी गेलो होतो. त्यासाठी मी पासपोर्ट नूतनीकरणासाठी गेलो असता तेथील अधिकाऱ्याने विचारले की, तुम्ही कॅनडाला जुगार खेळायला जात आहात का? तेव्हा मी त्याला म्हटले की, तुम्ही माझी कागदपत्रे नीट पाहिलेली नाहीत. तो सुशिक्षित इसम होता, पण त्यालाही या खेळाबद्दल काही माहीत नव्हते. त्याला मि म्हणालो हा खेळ आहे जुगार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)