ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, तर संरक्षण द्या

“ब्रह्मोद्योग-2018′ मध्ये विविध ठराव

पुणे  –
ब्राह्मण समाज स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम आहे. त्यांना समाजाला आरक्षण नको, आरक्षणाऐवजी संरक्षणाला प्राधान्य द्यावे, तसेच भारतीय संस्कृती जतनासाठी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये व आरक्षणाबाबत पुनर्मूल्यांकन करून वंचित घटकांना न्याय द्यावा, असे ठराव “ब्रह्मोद्योग-2018′ या महोत्सवात पारित करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित “ब्रह्मोद्योग-2018′ या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवाच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी कुलगुरू पंडित वसंतराव गाडगीळ, प्रदेश अध्यक्ष उदय महा, सरचिटणीस श्‍याम जोशी, प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की, उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद झालटे, वकील आघाडीचे राजेंद्र पोतदार, प्रदेश सरचिटणीस विलास कौसाडीकर प्रदेश सरचिटणीस नीता कुलकर्णी, सरचिटणीस माधुरी देशमुख, आनंद दवे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुलकर्णी म्हणाले, “या राष्ट्रीय संमेलनात पाच प्रमुख ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये राममंदिराचा प्रश्‍न सामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे. हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी शबरीमाला मंदिरातमहिलांना प्रवेश देऊ नये, काश्‍मिरी पंडितांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन त्यांच्या मूळ ठिकाणी केले जावे. ब्राह्मण समाजाला आरक्षणापेक्षाही संरक्षण प्राधान्याने द्यावे आणि आरक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक पुनर्मूल्यांकन होऊन त्यात कालानुरूप आवश्‍यक ते बदल करावेत.’ महासंघातर्फे दि.25 ते 29 ऑक्‍टोबर या कालावधीत या महोत्सवाला जवळपास एक लाख लोकांनी सदिच्छा भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)