ब्राह्मणवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील 91 विद्यार्थ्यांच्या जीवशी खेळ

  • शाळेची धोकादायक इमारत : मुले जीव धोक्‍यात घालून गिरवतायेत धडे

कामशेत – वर्षभर पाठपुरावा करूनही बौर गावच्या ब्राह्मणवाडीतील मोडकळीस आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 91 विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ खेळला जात आहे. डोक्‍यावरचे गळके छप्पर आणि तडे अन्‌ खचलेल्या भिंतीमध्ये विद्यार्थी भविष्यकाळाची उजळणी करीत असल्याचे धक्‍कादायक चित्र दिसून येत आहे.

ब्राम्हणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या सात खोल्या आहेत; पण मागील अनेक दिवसांपासून शाळेवरील छत पावसाळ्यात गळते. वर्गातील फरशा फुटल्याने पावसाळ्यात खोल्यांमध्ये ओलावा आला आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी भीतीमध्ये मुरल्याने भितींना तडे गेले आहेत. तर काही भिंती खचल्या आहेत; यामुळे कुठल्याही क्षणी शाळेची इमारत कोसळण्याची भीती दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर्षापूर्वी जिल्हा परिषदेस पत्र व्यवहार करून शाळा दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी वर्षापूर्वीच शाळेची इमारत धोकादायक असल्याने शाळेच्या वर्ग खोल्या पाडण्याची गरज असल्याचे पत्र दिले होते. शाळेची इमारत धोकादायक जाहीर झाल्यानंतर देखील मागील वर्षभरापासून याच इमारतीत मुलांच्या जीवाशी खेळत अद्यापही शाळा सुरू आहे, याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहेत.

शाळेतील शिक्षकांनी खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या दोन अतिधोकादायक वर्ग खोल्या रिकाम्या ठेवल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या स्वयंपाक शेडमध्ये सातवीचा वर्ग भरविला जात आहे. स्वयंपाक तयार करण्याच्या शेडमध्ये मुलांना शिकविणे कठीण होत आहे, अर्थातच स्वयंपाक करण्याकरिता हे शेड रिकामे करावे लागत आहे; यामुळे विद्यार्थांची मोठी फरफट होत आहे. शाळेच्या या दयनीय अवस्थेत देखील प्रशासन जागे होत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्‍त करीत आहेत. आता मुख्याध्यापकांनी पाठपुरवठा केल्यानंतर शासनाकडे निधी नसल्याने शाळेचे काम होत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत; पण एखादी दुर्घटना घडल्यानंतर निधी मिळून तरी काय उपयोग असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

लोकप्रतिनिधींना “धडा’ शिकवा…
मराठी शाळेची पट संख्या दिवसेंदिवस घसरत असताना मराठी शाळेच्या अशा धोकादायक इमारतीमध्ये मुलांचा जीव धोक्‍यात घातला जात आहे. या शाळेत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण ? अशा चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये आहे. यामुळे शाळा दुरुस्ती न झाल्यास शाळा बंद करण्याचा निर्णय पालक व्यक्‍त करीत आहेत. शाळा बंद झाली तरी विद्यार्थांचेच नुकसान होईल आणि शाळा सुरू ठेवली तरी विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने मुलावर अन्यायच होत आहे. त्यामुळे देशात सर्व शिक्षण अभियान व बाल शिक्षणाचे पोवाडे गाणाऱ्या राज्यकर्त्यांनी आधी शाळा नीट बांधावी आणि त्यानंतर मुलाचे जीवन सुरक्षित केले पाहिजे, असा मतप्रवाह पुढे आला आहे.

पटसंख्येची घसरगुंडी थांबवा!
मुलभूत सुविधा नसलेल्या मराठी शाळा इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेमध्ये तग धरू शकत नाहीत; त्यामुळे मराठी शाळांच्या पटसंख्येत सातत्याने घसरत होत आहे. पट संख्येतील घसरण थांबविण्यासाठी मराठी शाळांमध्ये “सेमी इंग्लिश’चे सोंग आणले होते; ते देखील आता बंद केले आहे. आम्हास शिकविताना अडचणी येत असल्याचे कारण शाळा आता पुढे करीत आहेत. म्हणजे एकूणच मराठी शाळांची दयनीय स्थिती झालेली आहे.

 

बौर गावातील ब्राम्हणवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दुरुस्तीचा प्रस्ताव माझ्याकडे आला आहे. तसा ठरावही आला आहे, पण पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काम रखडले आहे. शाळेच्या नवीन बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून विषय मार्गील लावला जाईल.
– बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)