ब्राम्हण जागृती सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी विजयकुमार पाठक

बिजवडी, दि. 2 (वार्ताहर) – भाजपाचे माण तालुका सरचिटणीस विजयकुमार रमेश पाठक उर्फ पाठक आण्णा यांची ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या माण तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक क्षेञात कार्यरत असलेले पाठक आण्णा किल्ले वारुगड फाउंडेशन या शासन गौरवान्वित संस्थेचे कार्याध्यक्षही आहेत. ब्राह्मण समाजाव्यतीरीक्त सर्वच जातीधर्मातील लोकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडीबद्दल ना. शेखर चरेगावकर, माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, समस्त बडवे मंडळ शिंगणापूर व माण तालुक्‍यातील ब्राह्मण समाजाने अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)