ब्राम्हणोली गावामध्ये भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट

पवनानगर – ब्राम्हणोली गावाच्या परिसरामध्ये गेल्या पाच सहा दिवसांपासून 15-20 भटक्‍या कुत्र्याचा वावर होताना दिसत आहे. ही कुत्रे नागरिकांच्या तसेच जनावरांच्या अंगावर हल्ला करीत आहेत. या ब्राम्हणोली गावातील काही ग्रामस्थांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर दोन जनावरांच्या अंगावर हल्ला केला आहे. ही कुत्री मोठ्या प्रमाणात असून, एका जनावराचा या कुत्र्यांनी जीव घेतला आहे.

ब्राम्हणोली हे गाव पवना धरणाच्या अगदी काही अंतरावर असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी असतात. व हे कुत्रे पर्यटकांच्यावर नागरिकांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे ब्राम्हणोली गावच्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सोनु काळे, एकनाथ काळे, रामदास काळे, मारुती काळे, हिरामण काळे यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)