ब्राम्हणोली गावचा पाणीप्रश्‍न सुटणार

  • नवीन पाणी योजनेला मंजुरी 

पवनानगर – ब्राम्हणोली गावासाठी साडेबारा लाख रुपयांची नवीन पाणी योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेचे नुकतेच भूमीपूजन करण्यात आले.

वारू-ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणोली गावासाठी टंचाईग्रस्त योजनेअंतर्गत पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. ब्राम्हणोली गावासाठी माजी मंत्री मदन बफना यांच्या काळात पाणी योजना मंजूर झाली होती. परंतु ही पाणी योजना फार जीर्ण झाल्याने लोखंडी पाईपला गंज धरला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न वारंवार उपस्थित होते. त्यातच गावातील लोकसंख्या व कुटुंबाची संख्या वाढल्याने या टाकीतील पाणी गावासाठी कमी पडत होते. त्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे नवीन पाणीयोजनेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली. या योजनेचे कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सेवादलचे अध्यक्ष मारूती काळे, कोथुर्णे सोसायटीचे उपाध्यक्ष मधुकर काळे, गावचे पोलीस पाटील तानाजी काळे, माजी उपसरपंच उमेश काळे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे, वैशाली पवार, बाळासाहेब काळे, गबळू काळे, शहाजी काळे, निवृत्ती काळे, ज्ञानेश्‍वर ताकदुंदे, ज्ञानेश्‍वर काळे, तुकाराम काळे, भरत काळे, माणिक काळे, विठ्ठल पवार, भाऊ दळवी, सुभाष साठे, कामाचे ठेकेदार परमेश्‍वर कुमार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

या वेळी बोलताना मारूती काळे म्हणाले की, या नवीन योजनेमुळे गावठाण व माळवाडी या दोन्ही ठिकाणच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे, त्याचप्रमाणे लवकरच गावठाण व माळवाडीसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात येणार असल्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करता येईल. सूत्रसंचालन शंकर काळे यांनी केले. रामजी काळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)