ब्राम्हणवाडा भूषण पुरस्काराने सन्मान

गावच्या विकासात उल्लेखनीय कार्य केलेल्यांची दखल
ब्राम्हणवाडा – ब्राह्मणवाडा गावच्या विकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना “ब्राह्मणवाडा भूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुलुंड (मुंबई) येथील कालिदास नाट्यगृहामध्ये या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे, कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे तसेच स्मरणिका प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते रवींद्र इथापे, मराठी बाणा फेम अशोक हांडे, नवी मुंबई मनपाचे विधी सभापती गणेश म्हात्रे, ब्राह्मणवाडा पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक गायकर, बजरंग दलाचे शंकर गायकर, मधुकर गायकर, “यशो मंदिर’चे अध्यक्ष बी. जी. गायकर, रायगड बॅंकेचे अध्यक्ष राजीव काळे, मधुकर गायकर, शारदा गायकर, ऍड. किसन हांडे हे मान्यवर उपस्थित होते.
या वेळी देण्यात आलेले ब्राह्मणवाडा पुरस्कार पुढीलप्रमाणे : राजकीय-भाऊसाहेब हांडे, उत्कृष्ट सरपंच- लक्ष्मण आरोटे, कुशल प्रशासक- धोंडीराम शिंदे, सामाजिक -रामदास फलके, सांस्कृतिक-उमाजी गायकर, तंटामुक्ती व जातीय सलोखा-हसन पटेल, शैक्षणिक- आनंदा गिते, नामदेव खणकर, कायदेतज्ज्ञ-मारुती पाबळे, कला-सदाशिव हांडे, क्रीडा-शरद हांडे, उद्योग-प्रभाकर गायकर, धार्मिक-गोविंद हांडे, वैद्यकीय-रत्नेश शिंदे, मनाबाई आरोटे व प्रगतशील शेतकरी- भगवंता पाबळे. दिवंगत व्यक्तींचे पुरस्कार त्यांच्या नातेवाइकांनी स्वीकारले. या वेळी “ब्राह्मणवाडा भूषण स्मरणिके’चे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी रवींद्र इथापे यांनी ब्राह्मणवाडा गावचे सहकारामधील योगदान, यशोमंदिर पतसंस्थेच्या उभारणीमधील ब्राह्मणवाडा गावचा सहभाग आदींवर प्रकाशझोत टाकला. मुंबईसारख्या शहरात भव्य अशा कालिदास नाट्यगृहात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांना एकत्र आणण्याचे काम ऍड. अशोक गायकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केले. अकोले तालुक्‍याला भाऊसाहेब हांडे, एल. बी. आरोटे व समाजाभिमुख कार्यकर्ते या गावाने दिले आहे. सर्व क्षेत्रात ही मंडळी आघाडीवर आहेत. हे स्नेहसंमेलन या वर्षापुरते न राहता दरवर्षी घ्यावे व काही मदत लागल्यास मी आपल्या मागे भक्कमपणे उभा राहील, असे इथापे यांनी या वेळी सांगितले.
ऍड. अशोक गायकर यांनी प्रास्ताविकात स्नेहसंमेलन घेण्यामागची भूमिका विशद केली. सीताराम आरोटे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)