ब्राझीलियन पत्नीचा छळ करणाऱ्याला न्यायालयाचा दणका

 

चारित्र्याचा संशय आणि वंशाला दिवा हवा म्हणून करत होता पत्नीचा छळ


पत्नी, मुलीचा छळ न करण्याचा आणि ती राहत असलेल्या ठिकाणी न जाण्याचा पतीला आदेश

पुणे- चारित्र्याचा संशय आणि वंशाला दिवा हवा म्हणून ब्राझिलियन पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नी राहत असलेल्या घरात जायचे नाही, पत्नी आणि तीन मुलींचा कोणत्याही प्रकारे छळ करायचा नाही, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी दिले आहे. आना आणि बिरजू (नावे बदलेली आहेत) असे या पती-पत्नीचे नाव आहे. आना ही मुळची ब्राझिलची असून तिने भारतीय नागरिक असलेल्या बिरजू बरोबर 1999 साली प्रेम विवाह केला. आना ही शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला असून बिरजू हा एक एनजीओ चालवतो. पहिली मुलगी झाल्यानंतर वंशाला दिवा म्हणून आपल्याला मुलगाच हवा, अशी मागणी बिरजू वारंवार करीत होता. तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तो तिला मानसिक, शासरिक त्रासही देवू लागला. दरम्यान तक्रारदार पत्नीला तीन मुली झाल्या. त्यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या छळात वाढ होत गेली. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने न्यायालयात धाव घेतली. पीडितेने ऍड. अभिजीत निमकर आणि अक्षत कुमार यांच्यातर्फे न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत, अशी माहिती ऍड. निमकर यांनी दिली. या प्रकरणात ब्राझील दुतावासाने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, आना यांना त्या काम करीत असलेल्या कंपनीने हंगेरी येथील कार्यालयात व्यवस्थापक पदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे तिने मुलींसह हंगेरीला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विल्सन याने हरकत नसल्याचे पत्र दिले होते. मात्र, आता त्याने मुलींचा दाबा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. पण विल्सन यांच्यावर बालकांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याकडे मुलींना त्याकडे ठेवणे धोकादायक असल्याचे ऍड. निमकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनात आणून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)