गोवाहटी – ब्रह्मपुत्रा नदीमध्ये एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये एक जण बुडाला तर किमान 23 जण बेपत्ता झाले आहेत. या यांत्रिकी बोटीमध्ये 36 प्रवासी होते. त्यापैकी 12 जण पोहून सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य आपत्ती मदत दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने एका व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे, असे कामरुपचे उपायुक्‍त कमल कुमार बैश्‍य यांनी सांगितले. या भागात बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे त्यांनी संगितले.

ही यांत्रिकी बोट दुपारी 2 वाजण्यच्या सुमारास नदीच्या पात्रात असतानाच तिचे इंजिन बंद पडले. अश्‍वक्‍लांत मंदिराजवळ असताना ही बोट एका खडकावर आपटली आणि बुडाली. या बोटीतून प्रवास करणाऱ्यांपैकी केवळ 22 प्रवाशांकडेच वैध तिकीटे होती आणि अन्य प्रवाशांनी बोटीमध्ये जागा मिळवण्यासाठी गर्दी केली होती. याशिवाय 18 मोटरसायकलीही बोटीमध्ये चढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त होती, असे काही साक्षीदारांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)