ब्रह्मचैतन्य पुरस्कार आणि हिंदू दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

  • संत श्री एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराजांची उपस्थिती

रहाटणी : ब्रह्मचैतन्य परिमंडळ पिंपरी-चिंचवड तर्फे ब्रह्मचैतन्य पुरस्कार प्रदान आणि हिंदू दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. श्री संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. प्रभाकरशात्री धारूरकर, पूर्णवादी बॅंकेचे माजी अध्यक्ष अरुण निरंतर आणि गणेश हुंबे यांना ब्रह्मचैतन्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या समारंभास उद्योजक पुष्कराज गोवर्धन, ब्रह्मचैतन्य परिमंडळचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, विश्वस्त कमलाकर कुलकर्णी, सरचिटणीस अनुपमा कुलकर्णी, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी व अनुराधा कुलकर्णी, तसेच दिलीप जोशी, शशिकांत जुन्नर, यदुराज पारेकर, वासुदेव कुलकर्णी, राजन बुडुख, अनंत कुलकर्णी, श्रद्धा काडगावकर, शंकर कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, अर्चना देशपांडे, शरयू जोशी, पद्माकर जोशी, योगेश पाटील, प्रवीण कुलकर्णी, ज्योती सताळकर, परशुराम डांगे, मधुकर रामदासी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर म्हणाले, ब्रह्मचैतन्य परिमंडळ पिंपरी-चिंचवड गेली 22 वर्षापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्‍तींना पुरस्कार देऊन सन्मान करत आहे. त्यामुळे आपण देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो हे प्रत्येकांनी लक्षात ठेवले पाहिजे, तसेच ब्रह्मचैतन्य परिमंडळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन इतरांनीही सामाजिक बांधिलकी जोपासावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)