ब्रम्हास्त्रची तुलना ऍव्हेंजर्सबरोबर नको – रणबीर

काही दिवसांपूर्वी अलिया भटने आपल्या आगामी “ब्रम्हास्त्र’बद्दल बोलताना हा सिनेमा बॉलिवूडसाठी “ऍव्हेंजर सिरीज’सारखा असेल, असे म्हटले होते. मात्र “ब्रम्हास्त्र’मध्ये अलियाबरोबर मुख्य भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरने मात्र याच्या बरोबर विरुद्ध मत व्यक्‍त केले आहे. “ब्रम्हास्त्र’ ची तुलना “ऍव्हेंजर्स’ बरोबर करणे ही खूप मोठी बाब होईल. अशी तुलना करणे योग्य होणार नाही. सध्या “संजू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रणबीरला ही तुलना विशेष आवडली नाही.

“ब्रम्हास्त्र’चे डायरेक्‍टर अयान मुखर्जी हे रणबीरचे चांगले मित्र आहेत. त्यांनी 5 वर्षात “ब्रम्हास्त्र’ची कथा लिहीली आहे. ही कथा तीन स्वतंत्र भागांमध्ये लिहीली गेली आहे. अशाप्रकारचा सिनेमा बॉलिवूडसाठी खूप नवीन आहे. याला “सुपरहिरो’चा सिनेमा म्हणता येणार नाही. हा तर एक सुपर नॅचरल सिनेमा असेल आणि आजच्या जमान्यासाठी एकदम परिकथा वाटावी, असा असेल, असे रणबीर म्हणतो. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेकडे एक सुपर नॅचरल पॉवर असणार आहे. यामध्ये अलिया आणि अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्‍त इतरही अनेक कलाकार असणार आहेत. “ब्रम्हास्त्र’याच वर्षी 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे आणि संपूर्ण सिनेमा तीन भागांमध्ये असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)