बौर ते किवळे सर्व्हिस रस्त्याची तत्काळ पाहणी करा

  • सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे “आयआरबी’ला निर्देश

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत बौर-किवळे दरम्यान सेवा (सर्व्हिस) रस्ता नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना जीव धोक्‍यात घालून द्रुतगती मार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. सर्व्हिस रस्त्याअभावी परिसरातील वाहने एक्‍स्प्रेस मार्गावर येत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुख्यत: किवळे ते बौर दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी द्रुतगती महामार्गासाठी संपादित झालेल्या असताना त्याच शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले, त्याची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सर्व्हिस रोडची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले असल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)