बोहरा समुदायाने जगाला शांतीचा संदेश दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी : “वसुधैव कुटुंबकम’ परंपरेमुळे भारताची वेगळी ओळख
इंदौर – मध्य प्रदेशमधल्या एका मशिदीमध्ये दाउदी बोहरा समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाउदी बोहरा या समाजाचे देशप्रेम हे सगळ्या भारतासाठी एक आदर्श उदाहरण ठरावे असे आहे. बोहरा समुदाय हा शांतीचा संदेश देत जगतो. हा शांतीचा संदेश भारताचे जगातल्या अन्य देशांपेक्षा असलेले वेगळेपण अधोरेखीत करतो, “वसुधैव कुटुंबकम’ या परंपरेमुळे भारताची वेगळी ओळख आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेशातल्या एका मशिदीमध्ये दाउदी बोहरा समुदायासमोर बोलत होते.

अशारा मुबारक या इमाम हुसेन यांच्या पुण्यतिथीला झालेल्या कार्यक्रमात इंदौरमध्ये पंतप्रधान सहभागी झाले होते. इस्लामी वर्षाच्या सुरुवातीला अशारा मुबारक पाळण्यात येतो. प्रेषित मोहम्मदांचे नातू इमाम हुसेन यांच्या आठवणी या काळात जागवण्यात येतात.

मोदी म्हणाले, गुजरातमधल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत बोहरा समुदायाशी माझे अत्यंत चांगले संबंध जुळले होते. तसेच मला प्रत्येकवेळी बोहरा समुदायाने सहकार्य केले. बोहरा समाजाने आपली “वसुधैव कुटुंबकम’ ही परंपरा जगभरात नेली. तसेच स्वच्छ भारत प्रमाणे आपण आपले मन आणि आत्माही स्वच्छ ठेवायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

बोहरांचे धार्मिक प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते. दाऊदी बोहरा समाजाचे सय्यदना हे 53वे धर्म धर्मगुरू आहेत. 12 सप्टेंबरपासून त्यांचे इंदौरमध्ये धार्मिक प्रवचन सुरू आहे. सय्यदना हे प्रथमच इंदौरमध्ये आले आहेत. यापूर्वी सुरतमध्ये ते आले होते. तर त्यांचे वडील दोन वेळा इंदौरला आले होते.

या वर्षाअखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका असून भाजपासाठी या दृष्टीने पंतप्रधानानांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. इंदौरमध्ये मोठ्या प्रमाणावर बोहरा समाजाचे लोक राहत असून उज्जैन व बुऱ्हाणपूरचाही विचार केला तर मध्यप्रदेशमध्ये एकूण अडीच लाख बोहरा मुस्लीम राहतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)