बोल्हेगावच्या राघवेंद्र मंदिरासह रविश कॉलनीत दोन घरफोड्या 

नगर – शहरातील वसाहतींसह सर्वसामान्यांचे कुटुंब पोलिसांच्या सुरक्षितेपेक्षा चोरांपासून असुरक्षित असल्याचे वारंवार समोर येत आहे. बोल्हेगाव येथील राघवेंद्र स्वामी मंदिरासह कल्याण रोडवरील रविश कॉलनी येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. राघवेंद्र स्वामी मंदिरातून मूर्तीवरील चांदीचा मुकूट आणि चांदीचा नागाची मूर्ती असा सुमारे 50 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या तिन्ही ठिकाणाहून चोरांनी सुमारे एक लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

बोल्हेगाव येथील राघवेंद्र स्वामी मंदिरातील मूर्तीवर मुकूट आणि चांदीचा नाग चोरांनी चोरून नेला. तोफखाना पोलिसांनी बाबुराव भाऊपाटील खालकर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी ही चोरी केली. मुकूटाची 35 हजार आणि चादींच्या नागाची सुमारे 15 हजार रुपये किंमत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कल्याण रोडवरील रवीश कॉलनी येथे दोन ठिकाणी घरफोडी झाली, तर काही ठिकाणी चोरांचा प्रयत्न फसला. रविश कॉलनी येथील (कै.) किशोर पाटील यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी येथे चोरी केली. चोरीपूर्वी पाटील यांच्या घराच्या आजूबाजूच्या रहिवाशांच्या घराच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या. प्रशांत दहातोंडे यांच्या घरातून चोरांनी 25 हजार रुपये चोरून नेले. दहातोंडे घरात जागे असताना ही चोरी झाली. किशोर सराफ यांच्या घराचे कुलूप तोडले होते. घरात चोरांना काहीही मिळाले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)