बोलेरो-दुचाकीच्या धडकेत एक ठार

भुईज – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर भुईंज गावच्या हद्दीत बोलेरो कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. विष्णू वामन वाघ (वय 65, रा. कळंभे) असे अपघातातील मृताचे नाव असून बाळकृष्ण भिकू सोनावणे-जाधव (वय 45, रा. विरमाडे, ता. वाई) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कळंभे येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघ आणि विरमाडे येथील बाळकृष्ण भिकू सोनावणे-जाधव हे दोघेजण सुरुरवरुन घरी निघाले होते. त्यांची दुचाकी भुईंज गावच्या हद्दीत आली असताना पाठीमागून आलेल्या बोलेरो कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विष्णू वाघ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून बाळकृष्ण सोनावणे-जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. जखमी बाळकृष्ण सोनावणे-जाधव हे सध्या चिंधवली येथील सोसायटीमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)