बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

लोणंद, दि. 9 (प्रतिनिधी) – रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वारास बोलोरेने दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात लोणंद-खंडाळा रोडवरील खेड गावच्या हद्दीत बुधवारी घडला. विघ्नहर ननावरे असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, अंकुश धायगुडे राहणार सुखेड यांच्या मालकीची बोलेरो गाडी नंबर एम एच 14 डीएक्‍स 8661 भरधाव वेगाने लोणंदहून सुखेडकडे निघाली होती. याच वेळी वायदंडे वस्ती येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विघ्नहर ननावरे यांना या बेलरो गाडीने जोराची धडक देऊन त्यांना मोटारसायकल सह दहा फूट फरफटत नेले. यामध्ये त्यांच्या डोक्‍याला व पाया गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने लोणंद येथील खाजगी दवाखाण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले असून याबाबत सायंकाळपर्यंत लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास पोलीस हवालदार नलावडे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)