बोलणे व कृतीत साम्य असणाराच खरा वक्ता- कदम

अकलूज- वक्तृत्व ही कला आहे, त्याचे शास्त्र समजून घेऊन वाटचाल करायला हवी. ज्याच्या बोलण्यामध्ये व कृतीमध्ये साम्य आहे तोच खरा वक्ता असतो, असे मत प्राचार्य महेंद्र कदम यांनी व्यक्त केले.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात महर्षी करंडक शालेय व खुल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख, परिक्षक चंद्रशेखर मलखमपट्टे, समाधान काळे, नवनाथ गोडसे यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते.
यावेळी कदम यांनी वक्तृत्व कले विषयी मार्गदर्शन केले. मदनसिंह मोहिते-पाटील यांनी वक्तृत्व कलेचे महत्त्व विषद करून अशा स्पर्धा घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रस्तावना विश्वनाथ आवड यांनी केली. सुत्रसंचलन स्वाती सिद व गौरी देवकर यांनी केले तर चंकेश्वरा लोंढे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)