बोलक्‍या भिंतीमुळे देवले शाळेचे विद्यार्थी आनंदात

सामाजिक संदेश चित्रातून पालकांची जनजागृती

कार्ला – ग्रामपंचयात देवले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील असणाऱ्या विविध भिंतीवर वेगवेगळ्या सामाजिक विषयावर अधारित संदेश देत आणि रंगरंगोटी करुन चित्र काढल्याने या भिंतीवरील चित्र पाहून शाळेचे विद्यार्थी आनंदीत झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती मिळत असून, शाळेबद्दल आवड निर्माण होत आहे. या चित्रांमुळे शाळेच्या परिसरात वेगळे वातावरण निर्माण झाले असून, शाळेत येणाऱ्या पालकांना देखील या भिंतीवरील सामाजिक विषयावर आधारित संदेश चित्रांमुळे जनजागृती देखील होत आहे. शाळेत आल्यावर एक वेगळाच अनुभव जाणवत आहे.

या चित्राची रंगरंगोटी लोणावळ्यातील चित्रकार दिलीप मानकामे, सचिन केदारी, धनंजय होनंगी, विशाल केदारी, गुप्ताजी व त्यांच्या सहकार्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. या रंगरंगोटीसाठी देवले ग्रामपंचयात निधी आणि शाळेच्या निधीतून हे रंगकाम करण्यात आले आहे. यासाठी देवले ग्रामपंचयात सरंपच महेंद्र आंबेकर, उपसरपंच मंगल आंबेकर, सदस्य संतोष गिरी, राजेश फुणसे, निलेश फाटक, सदस्या शारदा उंबरकर, सुरेखा जगताप, आश्‍विनी आंबेकर, शाळेच्या शिक्षिका स्मीता कुलकर्णी, मनिषा दरेकर यांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)