पुणे – सध्या बोर्डाच्या लोगोसह बारावी व दहावी निकालाच्या तारखा सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. अद्यापपर्यंत बोर्डाने निकालाच्या तारखा प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या निकालाच्या तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्‍वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी व दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा बोर्डाने आजमितीस जाहीर केलेली नाही. तथापि, बोर्डाचे लोगोसह (बोधचिन्ह) वापरून बारावी निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉट्‌स ऍप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर परस्पर व अनधिकृतरीत्या प्रसारित करण्यात येत आहेत. त्यावरून पालकांचा गोंधळ उडाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर व्हायरल होणाऱ्या अनधिकृत निकालाच्या तारखांवर विश्‍वास ठेवू नका, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी व दहावी परीक्षेची निकालाची तारीख मंडळामार्फत अधिकृत ई-मेलद्वारे, प्रसिद्धी माध्यमे व मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल. निकालाची तारीख विद्यार्थी, पालक, शाळा व संबंधितांना अधिकृतपणे जाहीर केले जातील.
त्यामुळे व्हायरल होणाऱ्या तारखांवरून गोंधळ करून नका, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे प्रभावी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी आज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)