बोर्डाच्या प्रश्‍नपत्रिका फुटण्याची मालिका सुरूच

संग्रहित छायाचित्र

आणखी काही प्रश्‍नपत्रिका फुटल्या? : राज्य मंडळाकडून पेपर फुटला नसल्याचे उत्तर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र, इयत्ता दहावीचा विज्ञान भाग एक, दोन, गणित भाग एक व दोन तसेच सामाजिक शास्त्र असे अनेक पेपर व्हॉट्‌स ऍपवर व्हायरल झाले असले तरीही राज्य मंडळाकडून मात्र पेपर फुटलेच नसल्याचे सांगितले जात आहे. मुख्य म्हणजे एका वृत्तपत्राच्या विद्यार्थी मार्गदर्शन पुस्तिकेत सराव प्रश्‍नपत्रिकांमध्ये छापलेला इयत्ता दहावीचा सायन्स ऍन्ड टेक्‍नोलॉजीचा पेपर एक दोन किरकोळ बदल वगळता संपूर्णपणे जसाच्या तसा यंदाच्या परीक्षेला आला असल्याचे समोर आले आहे. तर मुंबईत सामाजिक शास्त्र विषयासंदर्भात पकडलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या आधीही असे पेपरफुटीचे प्रकार घडल्याचे समजते आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी इयत्ता दहावी तसेच बारावीची परीक्षा सध्या राज्यभरात सुरू आहे. दहावीच्या परीक्षेला साडेसतरा लाख तर बारावीच्या परीक्षेला जवळपास पंधरा लाख विद्यार्थी बसले आहेत. मात्र, आतापर्यंत चार पेपर व्हॉट्‌स ऍपवर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. मात्र, तरीही राज्य मंडळाकडून हा प्रकार पेपरफुटीचा नसून कॉपीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या एकूणच झालेल्या पेपरफुटीबाबत तसेच दोन महिने आधीच छापून आलेल्या पेपरबाबत मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, जे जे प्रकार समोर आले आहेत, त्या सर्वांबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, अंतर्गत चौकशी देखील आमच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. दरम्यान, दोन महिन्यापुर्वी छापून आलेल्या त्या पेपरची परीक्षा पुन्हा घ्यायचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

पेपर व्हायरल झाले असले तरीही ते परीक्षा सुरू होण्याच्या आधी झालेले नाहीत. दरम्यान, समाजशास्त्र विषयाबाबत सध्या पोलीस चौकशी करत आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याबाबत काही सांगता येईल. तर, दोन महिन्यांपूर्वी छापून आलेली कॉपी व आताचा पेपर मागविण्यात आला आहे. त्याची तज्ज्ञांकडून शहानिशा केली जाईल व दोषींवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. –

शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)