बोरीभडक हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

यवत – दौंड तालुक्‍यातील बोरीभडक गावच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर यवत पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.27) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात नऊ आरोपींना अटक केली असून सुमारे 76 हजार 506 रुपयांची रोख रक्कम आणि 11 लाख 55 हजार रुपये किंमतीची एक स्विप्ट कार, एक पॅशन दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

याप्रकरणी राजेंद्र रामदास खेडेकर (वय 50, रा. बोरीभडक, ता. दौंड), विशाल महादेव कांचन (वय 27, रा. उरुळी कांचन, ता. हवेली), सागर बाळू कोतवाल वय 30, रा. आष्टापूर, ता. हवेली), हिरामण महादेव कोतवाल (वय 25, रा. आष्टापूर, ता हवेली), कैलास हरिभाऊ मल्लाव (वय 32,रा. हिंगणगाव, ता. हवेली), अतूल बापुसाहेब कांचन (वय 31), अमित दादासाहेब कोतवाल (वय 25, रा. आष्टापूर, ता. हवेली), अशोक बाळू तांबे (वय 38, रा.उरुळी कांचन, ता. हवेली), बाबा सोपान कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, बोरीभडक गावच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलीस नाईक दीपक पालखे, प्रवीण भोईटे, मनोज गायकवाड, सुनील नगरे या पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात हे नऊ आरोपी बेकायदा तीन पत्ती जुगाराचा खेळ खेळत असताना आढळून आले. त्यांच्याजवळ रोख रक्कम 76 हजार 506 रुपये आणि 11 लाख 55 हजार रुपये किंमतीची एक स्विप्ट कार, एक पॅशन दुचाकी पोलिसांनी या कारवाईत जप्त केली आहे. यवत पोलिसांनी मुंबई जुगार कायदा कलम – 12(अ) नुसार गुन्हा दाखल करीत सर्व आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक दीपक पालखे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)