बोरीतील टेफ्रा संवर्धनासाठी विशेष आराखडा

जुन्नर तालुक्‍याला ऐतिहासिक वारशात भर

बेल्हे-बोरी बुद्रुक येथे आदीम प्रागैतिहासिक काळात आढळून आलेल्या कुकडी नदी तीरावर ज्वालामुखीय राख (टेफ्रा) संवर्धनासाठी ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठीचा आराखडा तयार केला असून ग्रामस्थांनी या प्रागैतिहासिक माहितीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
जुन्नर तालुक्‍याला ऐतिहासिक वारसा आहे. पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. त्यातच आणखीन एक भर पडली आहे. ती म्हणजे बोरी बुद्रुक- बोरी खुर्द शिवारात कुकडी नदीच्या तीरावर आदीम प्रागैतिहासिक काळातील ज्वालामुखी राख आढळून आली आहे. साधारपणे तीन वर्षांपूर्वी या नदीत मोठ्या प्रमाणात चौदा लाख वर्षापूर्वीचे अवशेष सापडले होते. त्यातच या नदीत बेसुमार वाळु उपसा सुरू होता, याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रसार माध्यमातून वाळु उपसाच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर वाळुउपसा बंद झाला. त्यानंतर कुकडी नदीच्या तीरावर उपरोक्त अवशेष पुरातत्वीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याचे जतन होण्याचे आवश्‍यक आहे.
नवीन पिढीला संशोधनासाठी प्रेरणा मिळेल तसेच भविष्यात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होईल. त्यानुसार पुरातत्वीय संस्थांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील तत्कालीन संस्कतीबाबत नेमका प्राचीन वारसा जगापुढे आणने शक्‍य होणार आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायतीने नदीच्या पात्रावर सर्व अवशेषांचे जतन, संवर्धन व माहिती येणाऱ्या तरुण पिढ्यांसाठी महत्त्वाची असल्याने वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. कुकडी नदीच्या पात्रात 1987च्या दरम्यान दोन्ही गावांच्या मध्यभागी कथांचे चौदा लाख वर्षापूर्वीचे ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे (टेफ्रा) पुरावशेष पुरातत्वीय संशोधनात आढळून आले होते. त्यानंतर पुणे येथील डेक्कन कॉलेजने नदीच्या तीरावर उत्खनन केले. यात त्यांचा प्रागैतिहासिक काळातील माणसाचे उपयोगात असलेली हत्यारे व प्राण्यांच्या अवशेषांचे अवशेष ज्वालामुखीच्या अवशेषांखाली सापडले आहेत. हे अवशेष सध्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात व डेक्कन कॉलेज मध्ये सुरक्षित आहेत.
दरम्यान बोरी गावचे वास्तुविशारद ईश्वरी जाधव यांनी वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार केला असून या अवशेषांचे जतन करण्यासाठी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, शीला मिश्रा, सुषमा देव, साबळे, पुरातत्वीय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, विलास वहाने, जुन्नर तालुका विकासचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पुर्णत्वास आले आहे. येथील ग्रामस्थांनी प्रागैतिहासिक माहितीच्या फलकाचे अनावरण नुकतेच केले. यावेळी जयप्रकाश कुलकर्णी, अरविंद गुप्ता, सरपंच पुष्पा कोरडे, माऊली शेटे, कैलास काळ्‌े, सुरेश काळे, सुदामा काळे, बबन काळे, रामदास चिंचवडे, रामदास काळे, नारायण चिंचवडे, योगेश काळे, बाळशिराम शेटे, रावजी कोरडे, सुरेश काळे, विजय जाधव, रमेश खरमाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

  • इंडोनेशिया येथील सुमात्रा बेटावर काही वर्षांपूर्वी सापडलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातील राख ही बोरी गावात आढळून आली आहे. ही ज्वालामुखीची राख हा जागतिक वसा असून त्याचे जतन करण्यासाठी व अश्‍मयुगीन काळातील पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी मदत होईल, असे अवशेष महाराष्ट्रात मोरगाव, बोरी या ठिकाणीच आहे. या राखेचे कालमापन अमेरिका, कॅनडा देशात झालेले आहे.
    -डॉ. शरद राजगुरू, माजी सहायक संचालक डेक्कन कॉलेज

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)