बोरीच्या बोरांना कोलकत्यात मागणी

कडाका आणि उमराण जातीच्या फळांना अधिक पसंती

वालचंदनगर – बोरी (ता. इंदापूर) येथील सुशिक्षित तरुणांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवर बोरांची लागवड करून लाखो रुपये उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत. परराज्यातील कोलकता येथील व्यापारी दरवर्षी संपर्क करून ट्रकच्या सहाय्याने कडाका आणि उमराण बोरं योग्य दरात खरेदी करीत आहेत.
इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील भागातील बोरी गावातील नितीन बापू शिंदे यांच्या पाच एकरातील कडाका आणि उमराण बोरांची जागेवर व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असल्यामुळे एकरी 2 लाख, तर 5 एकरातील बोरांचे 10 लाखाचे उत्पादन मिळाले आहे, त्यामुळे बोरांच्या बागाची शेती फायदेशीर ठरलेले आहे असे सुशिक्षित बेकार नितीन बापू शिंदे यांनी सांगितले. बोरी येथील पाच एकरात खडकाळ, मुरमाड पडीक असलेल्या जमिनीवर 30 वर्षांपूर्वी कडाका आणि उमराण जातीच्या बोरांची लागवड करण्यात आलेली आहे. आज बाजारात कडाका बोराला 45 रुपये किलो दर, तर उमराण बोराला 25 रुपये दर मिळत असल्यामुळे बाजारात बोरांची दिवसेंदिवस मागणी वाढली आहे.
इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी द्राक्षे, डाळींब बागांची लागवड करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना दिसत आहेत. मात्र, बोरी परिसरातील सुशिक्षित बेकार बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन नोकरीच्या पाठीमागे न लागता तांत्रिक आणि आधुनिकतेची जोड देत वडिलोपार्जित शेतीवर बोरांची यशस्वी बाग फुलवत आहेत. नापीक खडकाळ जमिनीवर हा प्रयोग करण्यात शिंदे यांना यश मिळाले आहे. 30 वर्षांपूर्वी जमिनीतील मोठे दगड बाहेर काढून कडाका बोराची लागवड करण्यात आली. पाण्याची तीव्र टंचाई असल्याने सुविधा उपलब्ध नसल्यामुळे घागरीने गावातील विहिरीचे पाणी आणून प्रत्येक झाड वाचायला शिंदे यांना पराकष्टा करावी लागली. दोन वर्षांनंतर फळ धारणा होण्यास मदत झाली. बोरांच्या उत्पादनात खर्च करून आज 5 एकरात बोरांची लागवड करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस बाजारात कडाका व उमराण बोराला कमालीची मागणी वाढलेले आहे.

  • तालुक्‍यातील शेतकऱ्याने आपल्याकडे असलेल्या माळरान पडीक खडकाळ नापीक जमिनी पडून ठेवण्यापेक्षा योग्य नियोजन करून बाजारपेठेत संपर्क ठेवून जर वेगवेगळ्या जातीच्या बोरांची लागवड करण्यात आल्यास बिगर भांडवली उत्पादन दरवर्षी मिळणार आहे. सध्या शेतकरी आर्थिक दृष्टीने संकटात सापडले आहेत. जर शेतकऱ्याने नवनवीन प्रयोग बाजाराधिष्ठित भाव लक्षात घेऊन तांत्रिक व आधुनिक पध्दतीने उत्पादन घेतल्यास आर्थिकदृष्ट्‌या सक्षम होण्यास वेळ लागणार नाही.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– नितीन शिंदे, बोरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)