लोणंद- सातारा जिल्ह्यातील बोरी गावची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार हातवारे करत व शिव्यांची लाखोली वाहत उत्साहात पार पडला.

श्रावणसरींच्या रिमझिम वर्षावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा अनोख्या सोहळा पाहण्यासाठी सुखेड आणि बोरी गावामध्ये असलेल्या ओढ्यात हजारोचा जनसमुदाय जमा झाला होता. दोन्ही बाजूच्या महिला हलगीच्या ताशाच्या ठेक्‍यावर वाजत गाजत आपापल्या ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन ओढ्याच्या तिरावर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास धावत आल्यावर दुसरीकडे असणाऱ्या तीरावरील महिलांना हातवारे करून एकमेकींना हलगी ताशा या वाद्यांचा साथीने शिव्यांची लाखोली वाहत हा सोहळा पार पडला. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने ओढ्यात पाणी नसल्याने संपूर्ण कोरडा पडलेल्या ओढ्यातच मोठा जनसमुदाय जमा झाला होता.

अस्सल गावरान शिव्या घालत हा अनोख्या सोहळ्यास सुरवात झाली. ओढ्यात पाणी नसल्याने नेहमीप्रमाणे एकमेकींच्या अंगावर पाणी उडवता न आल्याने यावेळी फक्त हातवारे करून व शिव्या देऊनच महिलांना आवरते घ्यावे लागले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या सोहळ्यासाठी नागरिकांनी केलेली मोठी गर्दी आवरण्याचा आटोकाट प्रयत्न पोलिस कर्मचारी करत होते. तर सोहळ्यातील सहभागी महिलांना आवरण्यासाठी महिला पोलिस दल तैनात करण्यात आले होते. लोणंद पोलिस ठाण्याचे पोउनि. गणेश पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)