बोरीऐंदीत कृषी कीडरोगांबाबत मार्गदर्शन

चंदनवाडी- बोरीऐंदी (ता. दौंड) येथे जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून येथे आलेल्या कृषी कन्यांनी शेतीवर पडणाऱ्या विविध रोगांबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषी कार्यानुभवांर्तगत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिकन्यांनी बोरीऐंदी (ता. दौंड) येथे जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी फऱ्या, घटसर्प, तसेच लाळखुरकुत या रोगांविषयी कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. पावसाळ्यात जनावरे रोगाला बळी पडू नयेत म्हणून लसीकरण देखील केले. यावेळी बोरीभडक येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गाडे उपस्थित होते. यावेळी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असून ग्रामीण कृषी कार्यानुभवांर्तगत सहा महिन्यांचे प्रशिक्षण गावागावांतून घेत आहेत. यामध्ये चैताली ढोबळे, चैताली आळणे, मोहिनी पाटील, सुप्रिया भखरे, सोनाली शिंदे, योगिता आदलेंगे या कृषिन्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)