बोरा कॉलेजने बळकावली हुडकोची जागा?

  • हुडको न्यायालयात
  • शिरूरमध्ये वसतिगृहाचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

शिरूर – हुडको वसाहतीची (संभाजीनगर) रिकामी जागा शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कॉलेजने बळकावून त्याजागी विद्यार्थी वसतिगृहाचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून याबाबत हुडको न्यायालयात गेले आहे.
ही बाब न्यायप्रविष्ट असताना शिरूर नगरपालिका प्रशासनाने कोणाच्या सांगण्यावरून ही जागा वापरण्याची परवानगी दिली? असा सवाल लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी करून बोरा कॉलेजचे विश्वस्त व नगर परिषद प्रशासन यांचे साटेलोटे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हुडकोच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाले, याबाबत नगरपालिका प्रशासन, जिल्हा अधिकारी, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केलेली असून प्रशासनाने याची दखल न घेतल्याने अखेर हे प्रकरण हुडको वासियांनी न्यायालयात नेले आहे. न्यायालयाने प्रथम या वसतिगृहाचे बांधकाम व याच्या वापरास स्थगिती दिली असताना, शिरूर नगरपरिषद प्रशासनाने 28 ऑगस्ट रोजी या विद्यार्थी वसतिगृह वापरास परवानगी दिली आहे. बोरा कॉलेजच्या मूल्यांकनासाठी शनिवारी नॅक समितीचे पदाधिकारी आले होते. याच वेळी लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी बांडे म्हणाले, बोरा कॉलेजची अनेक बांधकामे अनधिकृत असून याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यांनी सत्ता, संपत्ती व त्यांच्या जोरावर शहरात मनमानी कारभार चालू ठेवला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद, मनविसेचे तालुका अध्यक्ष स्वप्नील माळवे, अविनाश घोगरे, शैलेर्शी जाधव, अमित पंडित उपस्थित होते.
हुडको वसाहतीच्या काही नागरिकांनी ही जागा हुडको वसाहतीच्या ओपन स्पेसची असल्याचा दावा केला आहे; परंतु हा दावा खोटा असल्याचे दावा बोरा कॉलेजचे माजी प्राचार्य व शिरूर शिक्षण मंडळाचे सह सचिव नंदकुमार निकम यांनी केला आहे. हे वसतिगृह संस्थेने बांधले असून यासाठीच्या सर्व परवानग्या संस्थेने घेतल्या आहेत. काही लोक याबाबत न्यायालयात गेले आहेत. संस्थेने याबाबत न्यायालयात लिहून दिले आहे की, जर संस्थेने बेकायदेशीर जागेत वसतिगृहाचे बांधकाम केले आहे, हे सिद्ध झाले तर संस्था स्वखर्चाने हे बांधकाम काढून घेण्यास तयार आहे. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले असून न्यायालयाने हे बांधकाम थांबवू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले असल्याचे निकम यांनी सांगितले. विद्यार्थी वसतिगृहाचे काम पूर्ण झालेले असताना याबाबत वापरायची परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात पत्र दिले; परंतु वापराबाबतचे अधिकार नगरपरिषदेस असल्याचे सांगितल्यावर याबाबतचे म्हणणे नगरपरिषदेला सांगितले. याचे म्हणणे नगर परिषदेसमोर मांडले. दोनच दिवसांपूर्वी नगरपरिषदेने वसतिगृह वापराची परवानगी दिली आहे.

वसतिगृह ही बाब न्यायालयात असली तरी विद्यार्थ्यांना वस्ती गृहात राहू देण्यात परवानगी नाकारलेली नाही. यास विरोध करणाऱ्या लोकांनी हेवेदावे व राजकीय वाद बाजूला ठेवून शैक्षणिक कार्यात कोणीही राजकारण आणू नये.
-नंदकुमार निकम, माजी प्राचार्य सी. टी. बोरा कॉलेज तथा सहसचिव शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)