बोरांना मागणी वाढली

गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 30 टक्‍क्‍यांनी वाढ
पुणे- सुट्टी असल्याने शहर परिसर आणि पर्यटन स्थळांमधून बोरांना मागणी वाढली अहे.
मार्केटयार्डात सध्या चमेली, उमराण, चेकनट आणि चण्यामण्या बोरांची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही बाजारात सर्व प्रकारच्या बोरांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत सुमारे 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
मार्केट यार्डातील फळ विभागात सध्या सोलापूर जिल्ह्यातील आष्टी, मोहोळ परिसरातून आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनदर परिसरातून आवक होत आहे. पुण्यातील बाजारातून महाबळेश्वर, पाचगणी, वाई, गोवा, लोणावळा आदी परिसरातील व्यापाऱ्यांकडून बोरांची खरेदी केली जात आहे. जानेवारी महिन्यात संक्रांत सण असतो. या सणालाही बोरांना अधिक मागणी असते. त्यामुळे बोरांच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता
व्यापारी प्रवीण शहा यांनी वर्तविली आहे. बोरांचा हंगाम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु झाला आहे. सध्या हंगाम बहरात असून आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे उत्पादनातही तब्बल 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. बाजारात दर्जेदार, उच्च प्रतीची बोरे दाखल होत आहेत. ही बोरे चवीला चांगली असल्याने ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. बोरांचा हंगाम 15 फेंब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे, असेही शहा यांनी सांगितले आहे. घाऊक बाजारात चमेली बोरास दहा किलोस 80 ते 110 रुपये, उमराण बोरांना 35 ते 50 रुपये, चेकनट बोरास 280 ते 300 रुपये आणि चण्यामण्या बोरांना 350 ते 370 रुपये भाव मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)