बोरदरा शाळेत एकता दिन उत्साहात

चिंबळी- बोरदरा (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश साळुंखे, सर्व सदस्य, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय तांबे यांनी एकता दिनाचे महत्त्व विशद करून मूल्यवर्धन उपक्रमाची व आजच्या उपक्रमाची घटनात्मक सांगड कशी घालता येईल, याची माहिती त्यांनी दिली. सहशिक्षिका चांगुणा सोनवणे यांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना एकता दिनाची शपथ दिली. संगीता माळवदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)