बोरगावजवळ टायर फुटल्याने कार पलटी

नागठाणे, दि. 17 (प्रतिनिधी) – ग्वाल्हेर-बंगलोर आशियाई महामार्गावर बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या पजेरो कारचा टायर फुटून कार महामार्गावरून सेवारस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिलांसह एक लहान मुलगा जखमी झाला. रविवारी सकाळी हा अपघात घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पजेरो कार रविवारी सकाळी मुंबईहून गोव्याकडे निघाली होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही गाडी बोरगाव गावच्या हद्दीतील महामार्गावरील उड्डाणपुलावर आली असता भरधाव वेगात असणाऱ्या गाडीचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती सुमारे 50 फूट खाली सेवारस्त्यावर आदळून पलटी होऊन पुन्हा सरळ झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ आघातस्थळी धाव घेतली. घटनास्थळी बोरगाव पोलीस व हायवे हेल्पलाईनचे कर्मचारीही पोहचले. अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला व एक लहान मुलगा जखमी झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)