बोरगावजवळ अपघातात महिला ठार

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी)- बोरगाव, ता. सातारा जवळ चारचाकी वाहनाचा टायर फुटून झालेल्या अपघातात संगीता दिलीप नलावडे ही महिला ठार झाली तर अन्य एक जण जखमी झाला. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगीता दिलीप नलावडे, (वय 45) रा. नेवाळीवस्ती, चिखली, जि. पुणे या आपल्या कुटुंबियांसह चिखली येथुन कराडकडे आय 20 नंबर एमएच – 14 डिएक्‍स 0693 या वाहनाचा बोरगाव जवळ महामार्गावर सकाळी 8 वाजता टायर फुटल्याने वाहन पलटी झाले संगीता नलावडे या गंभीर तर त्यांचा मुलगा रोहन दिलीप नलावडे ( वय 20) हा किरकोळ जखमी झाला. दोघांनाही तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना संगीता नलवडे यांचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)