बोफोर्स प्रकरणावर पडणार कायमचा पडदा

ऍटर्नी जनरलची सरकरला शिफारस
नवी दिल्ली – बोफोर्स तोफांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे प्रकरण नव्याने उपस्थित करण्याच्या प्रयत्नांना सरकारच्या ऍटर्नी जनरलनीच विरोध दर्शवला आहे. या खटल्यातील संशयीतांना दिल्ली उच्च न्यायालयाने बारा वर्षांपुर्वीच निर्दोष मुक्त केले आहे. आता या आदेशला सीबीआय मार्फत सुप्रिम कोर्टात आव्हान देऊन हे प्रकरण पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण आता त्यात काही अर्थ नाही, मुळात इतक्‍या उशिरा एखाद्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाच सर्वोच्च न्यायालयात मान्य केली जाण्याची शक्‍यता नाहीं त्यामुळे अशी आव्हान याचिका दाखल न करण्याची शिफारस ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी सरकारला केली आहे. आव्हान याचिका दाखल करण्यास जो बारा वर्षांचा विलंब झाला आहे त्याचे सबळ कारणही देता येणार नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

बोफोर्स प्रकरणात ब्रिटनस्थित हिंदुजा बंधुंवर आरोप होते. पण त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सन 2005 साली निर्दोष मुक्त केले आहे. त्यानंतर या निकालाला सुप्रिम कोर्टात आव्हान द्यायचे नाही असा निर्णय तत्कालिन कॉंग्रेस सरकारने घेतला होता. तथापी सन 2014 साली भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर संसदेच्या स्थायी समितीच्या एका बैठकीत या विषयावर सीबीआयने पुन्हा आव्हान याचिका दाखल करावी अशी शिफारस सरकारकडे करण्यात आली. भाजपच्या खासदारांनाही अशी मागणी केली होती. त्यामुळे बोफोर्स प्रकरण पुन्हा नव्याने उपस्थित होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. या विषयावर केंद्र सरकारने ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांचा अभिप्राय मागितला असता त्यांनी सरकारला वरील अभिप्राय कळवला आहे त्यामुळे बोफोर्स प्रकरणावर आता कायमचा पडदा पडणार आहे.

-Ads-

वेणुगोपाल यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे की दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय त्या निकालानंतर तीन महिन्याच्या आतच घ्यायला हवा होता. पण त्याला मोठा विलंब झाला. आता केंद्रातील सरकार बदलूनही तीन वर्षे झाली आहेत. त्यानंतर ही विशेष याचिका दाखल करण्यालाही काही अर्थ उरणार नाही. कारण या विलबांचे सरकारकडे सबळ कारण नाही आणि सीबीआयकडेही या प्रकरणात काहीं नव्याने सांगण्यासारखे नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)