बोफार्सचा कलंक पुसण्यासाठीच राफेलचा मुद्दा – पूनम महाजन

राहुल गांधींनी माफी मागावी

पुणे – गांधी परिवारावर असणारा बोफार्सचा कलंक साफ करण्यासाठीच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे राफेलचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व खासदार पूनम महाजन यांनी आज येथे केला.

सर्वोच्च न्यायालयाने जर राफेलमधून “क्‍लीन चिट’ दिली असतानादेखील कॉंग्रेसकडून वारंवार राफेलचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच भाजपच्या वतीने देशभरात 70 ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर आज पुण्यात पूनम महाजन यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी हा आरोप केला. संरक्षण खात्यातील व्यवहारांबाबत मोठी गोपनीयता राखावी लागते, पण याठिकाणी राहुल गांधी देशभर राफेलचा मुद्दा उपस्थित करत आहेत. याप्रकरणी वारंवार टीका करणे म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेवर विश्‍वास नसल्यासारखे आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी न्यायालयाची व जनतेची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. राहुल गांधींचा हा हेकेखोरपणा आहे. त्याविरोधात भाजप युवा मोर्चा लवकरच देशभरातील कॉंग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)