ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : बोपण्णा-बाबोसला उपविजेतेपद 

मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात रोहन बोपण्णा आणि हंगेरियन साथीदार तिमिया बाबोस या जोडीला पहिला सेट जिंकल्यानंतरही गॅब्रिएला डाब्रोव्हस्की व मेट पेव्हिक या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाचव्या मानांकित बोपण्णा-बाबोस यांचे आव्हान आठव्या मानांकित डाब्रोव्हस्की-पेव्हिक जोडीने 1 तास 8 मिनीटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात 6-2, 4-6, 9-11 असे परतावून लावले.

बोपण्णा-बाबोस यांनी पहिल्या सेटमध्ये दबदबा कायम राखत प्रतिस्पर्धानी केलेल्या चुकीचा पूर्ण फायदा घेतला. भारत-हंगेरीया जोडीला ब्रेक प्वाईंटच्या सात संधी मिळाल्या, ज्यातील 2 संधी यशस्वी ठरल्या. त्यानंतर डाब्रोव्हस्की-पेव्हिक जोडीने शानदार वापसी केली. दुसऱ्या सेटमध्ये सर्वोत्कृष्ट सर्व्हिस करत ब्रेक प्वाईटची एकही संधी गमाविली नाही.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये बोपण्णा-बाबोस यांनी पुन्हा एकदा सर्व्हिस गमाविल्याने टायब्रेकमध्ये गेलेल्या सेटमध्ये डाब्रोव्हस्की-पेव्हिक जोडीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. विशेषमध्ये बोपण्णाने गतवर्षी फ्रेच ओपनमध्ये कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्ड स्लॅम डाब्रोव्हस्कीच्या सोबत मिळविले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)