बोपखेल गावातील आरक्षित जागांचा ताबा घेण्याची मागणी

बोपखेल – बोपखेल गावचा महापालिकेत समावेश होऊन 18 वर्षे उलटली. तरीही बोपखेलमधील आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी विकास प्रकल्प राबविले नाहीत.

प्रशासनाच्या उदासिनतेमुळे व लोकप्रतिनिधींच्या या जागांवर अतिक्रमणे वाढू लागली आहेत. बोपखेल येथील महापालिकेच्या आरक्षित जागा अद्याप हस्तांतरीत झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना सुविधा देण्यात महापालिका कमी पडत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मैलाशुध्दीकरण प्रकल्पाची गरज आहे. मात्र, जागाच नसल्यामुळे मोठा अडसर येत आहे. आरक्षित जागांवर सर्रास ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. परंतु, जागा हस्तांतरित न झाल्यामुळे विकास प्रकल्प रखडले आहेत.

या सर्व कारणांमुळे बोपखेलचा विकास खुंटला आहे. नागरिकांनी मुलभूत व नागरी सुवे सुविधा मुबलक स्वरुपात मिळत नाहीत. बोपखेल, गणेशनगर, रामनगर या भागात पोलीस चौकी, उद्यान, क्रीडांगण, काही भागांत सर्वजनिक शौचालय, पोस्ट ऑफीस, शाळा, मंडई यांसारख्या सेवांची आवश्‍यकता आहे. परंतु, जागाच ताब्यात नसल्यामुळे लोकप्रतिनिधी देखील हतबल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)