पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल येथील आरक्षित जागेवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 3 कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे.
महापालिकेची बोपखेल येथे आरक्षित जागा आहे. त्याठिकाणी महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. मूळ 3 कोटी 34 लाख 3 हजार 253 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 3 कोटी 31 लाख 26 हजार 519 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मेसर्स डी. डी. कन्स्ट्रक्शन, मेसर्स बी. व्ही. इंडिया लिमिटेड, मेसर्स बी. के. खोसे आणि मेसर्स यशक असोशिएट्स या चार ठेकेदार कंपन्यांनी निविदा सादर केल्या.
त्यामध्ये सर्वाधिक कमी अर्थात 6.1 टक्के कमी दराची निविदा डी. डी. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने सादर केली. त्यांनी हे काम 3 कोटी 11 लाख 5 हजार 801 रुपये अधिक 2 लाख 20 हजार 584 रुपये रॉयल्टी आणि 56 हजार 150 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 3 कोटी 13 लाख 82 हजार 535 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे बोपखेल येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर उद्यान विकसित करण्याचे काम मेसर्स डी. डी. कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा