बोपखेलकडे जाण्यासाठी मिळणार पर्यायी मार्ग

file photo

“सीएमई’ला मोबदल्यात मिळणार जमीन ; रहिवाशांमध्ये नाराजी

पुणे – बोपखेलकडे जाणारा रस्ता मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेजने (सीएमई) बंद केल्यामुळे येथील रहिवाशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पर्यायी रस्ता देण्यासाठी “सीएमई’ची जागा ताब्यात घेऊन, त्याच्या मोबदल्यात सीएमईला तेवढ्याच किंमतीची जागा देण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पर्यायी जागा येत्या पंधरा दिवसांत शोधून त्या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्ता बंद केल्यानंतर याठिकाणी दगडफेक आणि लाठीमारीचा प्रकार झाला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिले होते. या रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सहा पर्याय तयार करण्यात आले होते. हे पर्याय तयार करताना महापालिका, सीएमई, खडकी कॅन्टोन्मेंट आणि ऍम्युनिशन फॅक्‍टरीच्या अधिकाऱ्यांची मते आणि नागरिकांची सोय विचारात घेण्यात आली होती. सध्याच्या अस्तित्वातील रस्त्यासाठी फक्त पंधरा कोटी खर्च येणार आहे. रस्त्याची डागडुजी, सुरक्षेसाठी यंत्रणा, सीसीटीव्ही या उपाययोजनांसह बारा ते अठरा महिन्यांत हा रस्ता करता येऊ शकतो का, हा पहिला पर्याय जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, दुसऱ्या पर्यायामध्ये इलिव्हेटेड रस्त्याचा समावेश होता. त्यासाठी सुमारे तीन हजार झाडांची कत्तल करावी लागणार आहे. तसेच या रस्त्यासाठी साधारण 90 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, शनिवारी नगरविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याला जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी आणि “सीएमई’चे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

बोपखेल ते खडकी या नदीमार्गावर फूल

बोपखेलवासियांसाठी पर्यायी रस्ता म्हणून बोपखेल ते खडकी या नदीमार्गावर फूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी “सीएमई’ची 1 हेक्‍टर 61 आर एवढी जागा लागणार आहे. बाजार भावानुसार या जागेची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे. तेवढ्याच किंमतीची जागा जिल्हा प्रशासनाकडून “सीएमई’ला देणार आहे. त्यासाठीचा खर्च आणि पूलाचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)