पुणे- आरबीएल क्रेडीट कार्डच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करुन महिलेच्या आरबीएल कार्डवर 900 बोनस मिळाल्याचे सांगितले. हे पॉईंट रिडींग करायचे असून त्यासाठी महिलेला विश्वासात घेत कार्डाचा गोपनीय क्रमांक मिळवून ऑनलाईन पध्दतीने खात्यातील पैसे हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका 53 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 6 डिसेंबर 2017 रोजी घडला. फिर्यादी महिला या शिवानंद सोसायटी, धनकवडी येथे ब्यूटी पार्लर चालवतात. एके दिवशी त्यांना एका अनोळखी नंबरवरुन कॉल आला. मी आरबीएल क्रेडीट कार्डाच्या कार्यालयातून बोलत असून तुमच्या कार्डवर 900 बोनस पॉईंट मिळाले आहेत. ते रिंडीग करण्यासाठी तुमच्या कार्डवरील माहिती देण्याची मागणी आरोपीनी केली. फिर्यादी महिलेला विश्वासात घेत माहिती मिळवली.
यानंतर या माहितीवरून तीचे कार्ड हॅक करुन ऑनलाईन पध्दतीने पैसे ट्रॉन्सफर केले. यामध्ये फिर्यादी यांची 65 हजार 328 रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) ए. टी. वाघमळे करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा