बोधेवाडीतील श्रमोत्सवात अबालवृद्धांचा सहभाग

लिंगायत समाज, भारत फोर्जतर्फे जलसंधारणाची कामे

सातारा – बोधेवाडी, ता. कोरेगाव गाव लिंगायत समाजाने दत्तक घेलने असून उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांच्या भारत फोर्ज कंपनीच्या वतीने गावात जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरमन्यान गेल्या 25 वर्षापासून कोरड्या असलेल्या विहरीचे खोदकाम केल्यानंतर विहीरीला पाणी लागल्याने गाव टॅंकरमुक्त झाले आहे.

बोधवाडी येथे जलसंधारणाच्या कामात लिंगायत संघर्ष समिती, विश्वेश्वर इंटरनॅशनल असोशिएशन आणि लिंगायत समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी श्रमदान केले. यावेळी बोधेवाडी व नागेवाडीदरम्यान असलेल्या 6 एकर तलावातील गेली अनेक वर्षांचा साठलेला गाळ, माती काढण्यात आला. 8 वर्षांच्या बालकांपासून 85 वर्षांच्या वृद्धांपर्यंत व्यक्तिंनी उत्साहाने सहभाग घेतला. आ. शशिकांत शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व सहकारी उपस्थित राहून या कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विश्वेश्वर इंटरनॅशनल असोशिएशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले अन्नदान, सुवर्णदान, गोदान, रक्तदानाबरोबरच श्रमदान हे पुण्याचे कार्य आहे. म. बसवेश्वर यांनी श्रमाचे महत्व अधोरेखित केले आहे. लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सौ. सरलाताई पाटील म्हणाल्या, लिंगायत धर्मात दासोह या उक्तिला फार महत्व आहे. म्हणुनच म. बसवेश्वरांच्या वचनाचे अनुकरण संघटनांनी केले आहे.

कार्यक्रमासाठी दि विश्वेश्वर सहकारी बॅंक, लिंगायत सेवा मंडळ पुणे, अर्थसिध्दी पतसंस्था पुणे, शुभयोग पुणे, महाराट्र वीरशैव तिराळे समाज संस्था सातारा, कला क्रिडा मंडळ विश्वेश्वर बॅंक, श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट आदी संस्थांनी विविध कामासाठी मदत केली. उपक्रमाचा वर्षभर पाठपुरावा करणारे अनिल रूद्रके, भगवान कोठावळे, श्रीकांत तोडकर, गणेश शेडगे व जितेंद्र मोटे यांच्या चिकाटीचे कौतुक सरपंच सौ. प्रिया राशिनकर केले. याप्रसंगी ऍड. अमोल राशीनकर, भगवान कोठावळे, सागर कस्तुरे, प्रकाश गवळी (सावकार) व अनिल रूद्रके यांची भाषणे झाली. याप्रसंगी बोधेवाडी व नागेवाडी गावाचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ, शंकर करळे, जगन्नाथ कोडुलकर, सचिन बेलागडे तसेच मुंबई, पुणे, सातारा सोलापुर सांगली कोल्हापूर या भागातुन स्वयंस्फुर्तीने व स्वखर्चाने हजारो स्वयंसेवक आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)