बोधेगावसह 54 गावातील पिकांनी टाकल्या माना..

बोधेगाव (ता. शेवगाव) : शेतकऱ्यांनी पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लागवड केलेल्या कपाशीची पुरेशा पावसाअभावी वाढ होऊ शकलेली नाही. (छाया : किरण तहकीक)

पावसाची ओढ शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी : खरीप हंगामा वाया जाण्याची भीती

बोधेगाव – सुरुवातीच्या एक ते दोन पावसानंतर उगवण झालेल्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, बाजरी, भूईमूग, पावसाळी कांदे आदी पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. शेवगाव तालुक्‍यातील बोधेगावसह 54 गावाकडे पावसाने पाठ फिरविली. खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालमटाकळी, बोधेगाव, हातगाव, मुंगी, काम्बी, सुकळी, शेकटे, लाडजळगाव, मुरमी, बाडगव्हाण, गायकवाडजळगाव, दिवटे आदी भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आभाळाकडे डोळे भरून बघत “येरे येरे पावसा’ अशी विणवनी करताना शेतकरी दिसत आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत तालुक्‍याच्या पूर्व भागात बोधेगाव, चापडगाव ही दोन मंडळ कृषी कार्यालये आहेत. दोन्ही मंडळात 54 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये बोधेगाव मंडळात 26 तर चापडगाव मंडळात 28 गावे आहेत. या दोन्हीही मंडळाता शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिक असणारे पांढरे सोने कपाशीची लागवड करतात.

“पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी लोटला. अद्यापही या भागात चांगल्या प्रकरचा एकही पाऊस झालेला नाही. सुुरुवातीच्या पावसावर आलेली थोडीफार पिकेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीचीही वेळ येण्याची भीती आहे. यामुळे जनावरांचेही चाऱ्याआभावी मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.” 

चंद्रकांत घाडगे,
प्रगतशील शेतकरी, बोधेगाव

दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरुवातीच्या एक ते दोन पावसावरच शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, मूग, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर या पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र त्यानंतर पावसाने या परिसराकडे एकदम पाठ फिरविली. त्यामुळे वीत ते दोन वीत वाढलेले पिक अगदीच कोमूजन गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. दोन ते अडीच महिन्यात या भागात म्हणावे तसा पाऊस अद्यापही पडला नाही. होते नव्हते ते हातातील चार पैसे खर्च झाले, आणि आता हे पिकही डोळ्यादेखत वाया जाणार या भीतीने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा येत आहे.

विहीर, अथवा कुपनलिकेची सोय असणारे शेतकरी उपलब्ध पाण्यावर उगवणलेले पिक कसे-बसे जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पाण्याचे कोणत्याही प्रकारचे साधन नाही, अशांना वरुणराजाचा धावा करण्याशिवाय गत्यंतर नाही. पाऊस पडत नसल्याने त्याचा परिणाम या भागातील विविध व्यवसायवरही जाणवत आहे. गावात सकाळी सकाळी लोकांची मोठी वर्दळ असते. मात्र मागील काही दिवसात गावातील वर्दळही काही प्रमाण कमी झाली आहे.

दिवसभर आभाळ येते, जोराचा वाराही सुटतो, पण पाऊस काही केल्या मात्र पडत नाही. आणखी दहा ते बारा दिवसात या भागात पाऊस पडला नाही, तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार हे निश्‍चित. कारण ही पिके जास्त काळ दम धरू शकणार नाहीत. आताच हलक्‍या रानावरील पिकांनी माना टाकल्या आहेत.पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही बिकट बनला आहे. त्यामुळे काही प्रमाणात असलेली मका, घास, गिन्नी गवत यावरच जनावरांची भूक भागविली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)