बोधगया बॉंबप्रकरणी जेएमबी दहशतवाद्याला बेंगळुरूत अटक

बेंगळुरू (कर्नाटक )- बोधगया बॉंबप्रकरणी दहशतवाद्याला एनआयएने बेंगळुरूत अटक केली आहे. मोहम्मद जाहिदूल इस्लाम उर्फ कौसर हा बांगला देशातील जेएमबी (जमात-ए-मुजाहिदीन) चा दहशतवादी आहे. बेंगळुरूच्या रामनगारा भागातील भाड्याच्या घरात त्याला सोमवारी पकडण्यात आले. तेथे तो आपल्या दोन बायकांसह राहत होता.

स्फोटकांच्या काही अवशेषांसह काही इलेक्‍ट्रॉनिक डिव्हायसेस त्याच्या घरातून जप्त करण्यात आली. बरद्वान बॉंबस्फोट प्रकरणासह अनेक प्रकरणात इस्लाम वॉंटेड आहे. इस्लामला एनआयए च्या विशेष न्यायालयात सादर करण्यात होते. त्याला पाच दिवसांचा ट्रान्झिट रिमांड्‌ देण्यात आला असून पाटणा येथील स्पेशल एनआयए न्यायालयात त्याला हजर करण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोधगया येथे जानेवारी महिन्यातील बॉंबप्रकरणाचा मोहम्मद जाहिदूल इस्लाम उर्फ कौसर मास्टरमांईंड आहे. त्याच्या आदेशावरून त्याचा सहकारी मुस्ताफिजूर रेहमान उर्फ शाहिन याने बॉंब तयार केलेले बॉंब बोध गया येथे 20 जानेवारी 2018 रोजी दलाई लामांच्या भेटीपूर्वी हे पेरण्यात आले होते, मात्र अगोदरच त्यांचा सुगावा लागला आणि ते निकामी करण्यात आले.
.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)