बोडखे यांच्या तडीपारीच्या निषेधार्थ हिंगोलीत निषेध मोर्चा 

हिंगोली: भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे यांच्याविरुद्ध झालेल्या तडीपारीच्या आदेशाविरुद्ध जेष्ठ सामाजिक नेत्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
प्रशांत बोडखे यांच्या विरोधात हिंगोली आणि कळमनुरी या दोन पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक- एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन गुन्ह्यांच्या आधारे हिंगोली पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी प्रशांत बोडके यांना हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.
बोडखे यांच्यावरील तडीपारीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून सामाजिक कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर त्यांच्या कामापासून विचलित करण्यासाठी आणि प्रस्थापित सत्ताधारी आणि राजकारण्यांना फायदा होण्यासाठी केल्याचा आरोप मोर्चा आयोजकांनी केला आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या विविध पक्ष, संघटनांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)