बोडके दादा विद्यालयात कीर्तनातून प्रबोधन

file photo

नीरा नरसिंहपूर- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील महादेवराव बोडके दादा विद्यालयात महादेवराव आण्णासो बोडके दादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी काजळे महाराज यांचे कीर्तन पार पडले. या कीर्तनातून प्रबोधन करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी खो-खो, कबड्डी, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत बोडके, रमेश मगर, मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कीर्तन कार्यक्रमास पांडुरंग महाराज उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब घाडगे यांनी केले. महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)