पुणे – दहीहंडी उत्सवात महिलासंबंधी बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांचा चहूबाजूंनी निषेध व्यक्त होत आहे. अशातच पुण्याच्या मीनाक्षी डिंबळे-पाटील या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे  तरुणीने राम कदमांना ओपन चॅलेंज दिले असून राम कदमांना आमने-सामने येण्याचे आव्‍हान दिले आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून राम कदम यांच्यावर टीका होत आहे.

मीनाक्षी म्हणते …. 
‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्र शंभू. मी मीनाक्षी पाटील पुण्याहून बोलतेय. घाटकोपरमधल्या दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी एक वक्तव्य केले. तुम्हाला एखादी मुलगी आवडली कि मला एका कॉल करा, मी तुला उचलायला मदत करतो. राम कदम तुम्हांला मी चॅलेंज करतेय. मला तुम्ही मुंबईला बोलावाव किंवा मी मुंबईला येते. मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा. बाकी पुढचं उचलून नेण्याची गोष्ट मी नंतर बघते. तुमचं हे बोलणे अत्यंत लांच्छनास्पद आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. इथे स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची जागा महाराष्ट्रात नाहीये. तुम्ही ज्या काही प्रकरणांवर बोललेलं आहात ना मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने-सामने, तुमच्या फोनची मी नक्की वाट बघेन. मी तुम्हाला खूप कॉल केले पण तुम्ही एकही कॉलचे उत्तर दिले नाही. आता प्रतीक्षा मला तुमच्या कोलची आहे. सर नक्की कॉल करा. माझे तुम्हांला ओपन चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारावं ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)