बोटा परिसरात पुन्हा सौम्य स्वरूपाचे धक्के

संगमनेर – तालुक्‍यातील बोटा व परिसरातील गावांमध्ये शनिवारी पहाटेनंतर भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
घारगाव परिसरात ऑगस्ट महिन्यात जाणवलेल्या धक्‍क्‍यानंतर आता बोटा परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. घारगाव परिसरातील धक्के थांबले , मात्र लगतच्या बोटा परिसरात आज भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के काही तासांच्या अंतरावर जाणवले. बोटा परिसरात मागील वर्षी जानेवारी महिन्यात सात ते आठ धक्के जाणवले होते. त्याची नोंद नाशिक येथील मेरी केंद्रातील भूकंपमापन यंत्रावर झाली होती. आज जाणवलेल्या धक्क्‌याची नोद भूकंपमापन यंत्रावर झाली नसल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक चारूलता चौधरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)