बोज्जा दांपत्याची इटली दौ-यासाठी निवड

नगर – मनसेच्या नगरसेविका वीणा बोज्जा व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांना सहजयोग फाऊंडेशनच्या वतीने इटली या देशात होणा-या सहजयोगच्या वर्ल्ड सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

प.पु. निर्मलादेवी यांनी सांगितलेल्य सहजयोग ध्यानधारणा आज जगातील विविध देशांमध्ये आचरणात आणली जात आहे. इटली येथेही मोठ्याप्रमाणात सहजयोगाचे साधक आहेत. इटली मधील कबेला या ठिकाणी दि.16 ते 26 ऑगस्ट दरम्यान सहजयोग वर्ल्ड सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनार मध्ये बोज्जा दांपत्य सहभागी होणार आहे. या वर्ल्ड सेमिनारच्या कालावधीत सहजयोग ध्यानधारणा बरोबरच श्रीकृष्णपूजा, श्रीगणेश पूजन, शास्त्रीय संगीत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अंतरराष्ट्रीय सहज विवाहाचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. हिंदू पद्धतीच्या वैदिक पद्धतीने होणा-या या विवाह सोहळ्यात विविध देशातील विवाह इच्छुक वधु वरांचा समावेश असणार आहे.

या वर्ल्ड सेमिनार मध्ये भारतातून 320 साधक इटलीला जाणार आहेत. नगरमधून नगरसेविका वीणा बोज्जा, श्रीनिवास बोज्जा यांच्या सह अंबादास यन्नम, अशोक कोतकर आदि जाणार आहेत. नगरच्या सहजयोग परिवाराच्या वतीने बोज्जा परिवारास इटली दै-यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बोज्जा परिवाराने या आधीही सहजयोगाच्या भारतातील विविध राज्यात व सिंगापूर येथे झालेल्या सेमिनार मध्ये सहभाग नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)