बोगस विद्यापीठाच्या सेंटरची स्थापना करणाऱ्याविरूद्ध गुन्हा

पुणे, दि. 4 – श्रीलंकेतील बोगस विद्यापीठाच्या सेंटरची स्थापना करणाऱ्याविरूद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मानवी हक्‍क संरक्षण व जागृती संघटनेचे उपाध्यक्षांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आयबीएमएस संस्थेच्या एन. एम. पोतदार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अभिषेक सुभाष हरिदास (36, रा. सिंहगड रोड) यांनी एका वृत्तपत्रात संबंधीत संस्थेची जाहीरात वाचली होती. यामध्ये आय.बी.एम.एस.संस्थेत एम. एस. पीजीडीसीसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू असल्याचे म्हटले होते. या कोर्सकरीता 9 हजार वार्षिक शुल्क असल्याचे सांगण्यात आले होते. या संस्थेची फिर्यादीने माहिती घेतली असता, ती श्रीलंका येथील विद्यापीठाशी संलग्न असल्याचे सांगण्यात आले. पदविका ही श्रीलंका येथील दि ओपन इंटरनॅशनल युनिव्हसीटी अल्टरनेटीव्ह मेडिसीन या संलग्न विद्यापीठाची देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. तसेच माहिती पत्रकासाठी 200 रूपये शुल्क घेण्यात आले. मात्र, चौकशी करता श्रीलंका येथील संबंधीत विद्यापीठ बोगस असल्याचे लक्षात आले. त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)