बोगस वाळू ठरावाची उच्च न्यायालयाकडून दखल

म्हसवड पालिकेला चपराक : जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश

म्हसवड, दि. 9 (प्रतिनिधी) – म्हसवड नगरपालिकेतील बोगस वाळू ठरावप्रकरणी उच्च न्यायालयाने चौकशी करून चार आठवण्यात निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. बोगस ठरावामुळे बदनाम झालेल्या नगरपालिकेतील संबंधित अधिकारी-पदाधिकाऱ्यांना ही मोठी चपराक बसली असून याप्रकरणी किती मासे गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हसवड पालिका सभागृहात नामंजुर झालेला ठराव चौघांनी संगनमताने मंजुर केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी म्हसवड पालिकेच्या कारभाराविरोधात तीन महिन्यांपूर्वी आठ तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे आले होते. तसेच आठ दिवस पालिकेसमोर उपोषणही करण्यात आले होते. मात्र, पालिकेने व जिल्हाधिकारी यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. तथापि, पॅनेलप्रमुख शेखर गोरे यांनी सत्ताधाऱ्यांना पाठीशी न घालता या प्रकाराची गंभीर दखल घेतली व स्वीकृत नगरसेवकाच्या वतीने दि. 7 सप्टेंबरला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमुर्ती शंतनू केमकर व न्यायमुर्ती सारंग कोतवाल या द्विसदस्यीय खंडपीठाने एका महिन्यात या बोगस वाळू ठरावचे अवलोकन करुन चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले आहेत. त्यामुळे बोगस वाळूचा ठराव प्रकरणाशी संबंधित असलेले पदाधिकारी-अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश असल्याने जिल्हाधिकारी ठरावाचा पर्दाफाश करणार का? किती मासे गळाला लागणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

-Ads-

काय आहे बोगस ठराव प्रकरण?
पालिकेच्या 14 नगरसेवकांनी ठराव बोगस असून रद्द करण्यात यावा, असे पत्र दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांनी निर्णय न दिल्याने स्विकृत नगरसेवक संग्राम शेटे यांनी तक्रारी केल्या होत्या. अजित केवटे यांनीही तक्रार करुन आठ दिवस उपोषण केले. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यावर खांडेकर यांनी एकतर्फी अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला. या अहवालावर तक्रारकर्त्यांनी आक्षेप घेत पुन्हा लेखी तक्रार केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी काहीच निर्णय न घेतल्याने शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम शेटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

म्हसवड नगरपालिकेमध्ये शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. तथापि, शेखरभाऊ चुकीच्या गोष्टींना कधीही पाठीशी घालत नाहीत. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे उशीर होत असला तरी थोड्याच दिवसात नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करून जनतेशी बांधिलकी ठेवणार आहेत.
-सुरेखाताई पखाले

What is your reaction?
45 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)