बोगस महाविद्यालय, विद्यापीठांच्या भुलथापांना बळी पडू नका

 

– तंत्रशिक्षण विभागाच्या पालक, विद्यार्थ्यांना सूचना

-Ads-

पुणे- राज्यात काही महाविद्यालये व विद्यापीठे ही अनाधिकृतरित्या कोणतीही परवानगी न घेता चालविण्यात येत आहेत. ही महाविद्यालये विद्यार्थ्यांना वेगवेगळी अमिषे दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत आहेत. त्यामुळेच अशा महाविद्यालयांची मान्यता तपासून मगच तेथे प्रवेश घ्या अशा सूचना तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत.

राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्‍नोलॉजी पदविका, तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेताना सावधनता बागळणे आवश्‍यक आहे, अशा सूचना राज्य तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिल्या आहेत. हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए, एमसीए, फार्मसी या व अशा अनेक अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांना सक्षम प्राधिकरण किंवा शासनाची परवानगी घेऊन हे अभ्यासक्रम व महाविद्यालये सुरू करता येतात. जी महाविद्यालये तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत चालविली जातात त्यांची यादी राज्य तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेते वेळी आपले महाविद्यालय हे सर्व मान्यता प्राप्त आहे का, याची खात्री करुन मगच प्रवेशाचा निर्णय घ्यावा असे वाघ यांनी सांगितले आहे.

काही अनाधिकृत महाविद्यालये व विद्यापीठांकडून अनेकदा फसवणूक केली जाते, त्याच्या अनेक तक्रारीही संचालनालयाकडे येतात. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलेले असते. सध्या प्रवेशाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळेच अशा प्रकारे कोणाही विद्यार्थ्याची फसवणूक होऊ नये, म्हणून तंत्रशिक्षण विभागाकडून याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)